पुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता. पुलवामा हल्ल्यामुळे सध्या देशभर संतापाची लाट असून सतत भारताच्या कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानप्रती मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष खदखदत असल्याने पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची गरज असल्याची भावना देशवासियांमध्ये आहे.

दरम्यान, पुलवामा येथे राखीव सुरक्षा दलाच्या काफिल्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्यावरून जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह अनेक नेत्यांनी सीमा सुरक्षा दलाचा एवढा मोठा काफिला गेल्या काही काळापासून अशांत असलेल्या काश्मिरात प्रवेश करत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय केले गेले नसल्याची खंत बोलून दाखवली आहे. विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी, गुप्तचर विभागाकडून सरकारला असा हल्ला होण्याची संभावना असल्याची माहिती पुरवण्यात आली होती मात्र सरकारने या माहितीकडे कानाडोळा केला असा दावा करण्यात आला आहे मात्र सरकारने हे दावे फेटाळले आहेत.

-Ads-

याच पार्श्वभूमीवर आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, “गुप्तहेर खात्याकडून केंद्र सरककडे ८ फेब्रुवारी रोजीच आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सैन्य दलांवर दहशतवादी हल्ला होण्याची संभावना वर्तविण्यात आली होती मात्र केंद्र सरकारने यावर कोणतेही पाऊल न उचलता दुर्लक्ष केले आणि हा मोठा हल्ला झाला.”

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)