पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज लोकसभा निवडणुकांच्या सातव्या व अखेरचा टप्प्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेचे या अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील नऊ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरू आहे.
दरम्यान, आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप व सीआरपीएफवर गंभीर आरोप लावले. त्या म्हणाल्या, “आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून भाजप व सीआरपीएफने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला. मी याआधी निवडणुकांमध्ये अशा प्रकारची वागणूक कधीही पाहिली नाही.”
https://twitter.com/ANI/status/1130073170101194752
Ads