लोकसभा निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जींना भाजपचा मोठा धक्का! 

तृणमूलच्या खासदाराचा भाजपात प्रवेश  

नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्या असतानाच आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार सौमित्र खान यांनी आज अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करत मोठा राजकीय भूकंप घडविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर खासदार सौमित्र खान यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नसून येथे सर्वत्र पोलीस राजच चालतो.”

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना, “देशातील अन्य युवकांप्रमाणेच माझा देखील पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.” अशा शब्दांमध्ये मोदींची स्तुती केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)