ममतांना पंतप्रधान बनण्यास राहुल गांधींच्या पाठिंब्याबाबत, ममतांनी केले ‘हे’ वक्तव्य 

नवी दिल्ली: २०१९च्या सार्वत्रिक निवडणूका जवळ आल्या आहेत. सत्ताधारी भाजपाकडून पंतप्रधान पदासाठी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव पुढे केले जाणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँगेसने अजूनपर्यंत पंतप्रधान पदाच्या दावेदाराचे नाव जाहीर न केल्याने अनेक शंका-कुशंकांना उधाण आले आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी प्रणित भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांकडून राष्ट्रीय पातळीवर महायुतीची मोट बांधण्याची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच काँगेसला पंतप्रधान पदाच्या दावेदाराबाबत विचारले असता महायुतीतील काँगेसइतर उमेदवाराचा देखील पंतप्रधान म्हणून विचार होऊ शकतो असे काँग्रेस तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

जर विरोधकांची महायुती झाली तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव पंतप्रधान पदाच्या दावेदारीसाठी अग्रणी असेल. याबाबत ममतांना विचारले असता “या गोष्टींबाबत चर्चा करण्याची ही योग्य वेळ नसून, सध्या भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ” असे वक्तव्य त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)