मल्लिकार्जुन खर्गे यांना जाधव यांच्याकडून आव्हान

कलबुर्गी – सोळाव्या लोकसभेत कॉंग्रेस नेतेपदाची धुरा वाहणारे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापुढे त्यांच्या कलबुर्गी पूर्वाश्रमीचा (गुलबर्गा) या परंपरागत लोकसभा मतदारसंघात त्यांचाच शिष्य आणि माजी कॉंग्रेस आमदार उमेश जाधव यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. कॉंग्रेसमधून आपल्या गळाला लावत आमदार जाधव यांना भाजपने कर्नाटकच्या या मतदारसंघात तिकीट दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत एकही निवडणूक न हरणाऱ्या खर्गेच्या अडचणी वाढल्या आहेत.

कलबुर्गी हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जातीय समीकरणे पाहात भाजपने खर्गे यांच्या शिष्यालाच कॉंग्रेसमधून पक्षात आणून गुरूविरुद्धच निवडणूक रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या तिकिटावर यंदा लोकसभा निवडणूक लढवणारे जाधव बंजारा (लमाणी) समाजाचे आहेत. कलबुर्गीत लमाण समाजाची 1 लाख 80 हजार मते आहेत. शिवाय अन्य दलित समाजाची 2 लाख 70 हजार मते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)