मळी मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने हाकलले 

रामेश्‍वरम – तामिळनाडूतील सुमारे 3 हजार मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने हुसकावून लावले आहे. या मच्छिमारांनी श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये प्रवेश केल्याच्या आरोपावरून 50 मासेमारी नौकाही मोडून टाकण्यात आल्या आहेत. मच्छिमार संघटनेच्या नेत्याने ही माहिते दिली.

तामिळनाडूमधील रामेश्‍वरम आणि मंदापम भागातील मच्छिमार बुधवारी सकाळी सुमारे 700 नौकांमधून मासेमारीसाठी गेले होते. कातचेलू जवळ मासेमारी करत असताना श्रीलंकेचे नौदल कर्मचारी तेथे आले आणि त्यांनी या मच्छिमारांना धमकावण्यास सुरुवात केली. मच्छिमार बोटींसह जाण्यापूर्वीच या मच्छिमारांवर दगडफेक करून पिटाळून लावण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बोटींची मोडतोड करण्यात आली. हे सर्व मच्छिमार गुरुवारी सकाळी कोणत्याही मासेमारीशिवाय परत आले, असे संघटनेचे अध्यक्ष पी. सेसुराजा यांनी सांगितले. भारत आणि श्रीलंके दरम्यानच्या कातचाथीवू या लहान बेटाजवळ मासेमारी करण्याचा अधिकार भारतीय मच्छिमारांना 1974 च्या कराराद्वारे प्राप्त झाला आहे, असेही सेसुराजा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)