गोल्डमॅन सॅककडून मलेशियाची फसवणूक 

मलेशियाच्या पंतप्रधानांचा आरोप

सिंगापूर – गोल्डमन सॅक या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय गुंतवणूक कंपनीने मलेशियाची फसवणूक केल्याचा आरोप मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी केला आहे. गोल्डमन सॅकविरोधात मलेशियात अब्जावधी डॉलरचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गोल्डमनमधील माजी अधिकारी टिम लेस्नर आणि एनजी चोंग हॉ यांच्याविरोधात अमेरिकेतील न्याय विभागाने या महिन्यात गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप दाखल केले आहेत. मलेशियातील वित्तीय संस्थांबरोबर संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

“एमडीबी’ (मलेशिया डेव्हलपमेंट बेर्हार्ड) या मलेशियाच्या स्वायत्त निधीतून ही अफरातफर झाल्याचा आरोप आहे. मलेशियाचे माजी नेते नजीब रझाक यांच्या काळातील अत्याधुनिक गैरव्यवहारात हे दोघे सहभागी होते, असा आरोप आहे. या गैरव्यवहारामुळे मलेशियात मे महिन्यात झालेल्या निवडणूकीत नजीब रझाक यांचा पराभव झाला होता.

टिम लेस्नर आणि एनजी चोंग हॉ यांनी मलेशिया आणि आबुधाबीतील अधिकाऱ्यांना लाच देऊन गोल्ड मॅनबरोबर सल्लागार करार करण्यास भाग पडले. या करारातूनच गोल्डमॅननी मलेशियाची 6.5 अब्ज डॉलरची लूट केली असा मलेशियाचा दावा आहे. मात्र अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या मते ही रक्कम 2.7 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. गोल्डमॅनने या करारांमधून 600 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त रक्कम शुल्क म्हणून मिळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)