माण तालुक्‍यात माळशिरसच्या वाळू तस्करांचे ठाण

महसूल मधील एका बड्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा

गोंदवले – माण तालुक्‍यातील माणगंगा नदीतील वाळुला ‘काळे सोने’ म्हणून ओळखले जाते. याच काळ्या सोन्यावर परजिल्ह्यातील वाळु तस्करांचा डोळा असून सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्‍यातील वाळु तस्करांची चार महिन्यात माण तालुक्‍यात मुजोरी वाढली आहे. त्यांना माण तालुक्‍यातील महसुल मधील एका अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा असून कोट्यवधींची वाळू चोरीला जात असून प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी जनतेमधुन होत आहे.

माण तालुक्‍यात माणगंगा नदीच्या पात्रातुन सध्या रात्र-दिवस वाळू उपसा होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाळुची चोरी होत आहे. मात्र, महसूल विभागातील तालुक्‍यातील अधिकारी व खालचे कर्मचारी अवैध वाळू उपसा होत असतानाही झोपेच सोंग घेत आहेत. म्हसवड, वाकी व देवापूरमधून उपसा केलेली वाळू सांगली व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यात नेली जात आहे. कधी-कधी ही वाळू नदीतून जेसीबीच्या साहाय्याने भरली जात आहे.

याला महसूलमधील नुकत्याच बदली होऊन माण तालुक्‍यात आलेल्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक वाळू तस्कर दिवसभर ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने वाळु बाहेर काढून त्याचा डेपो करून रात्री ट्रकमध्ये भरून माळशिरस व सांगलीकडे नेली जात आहे. या वाळूमाफियांनी अनेकवेळा महसूल कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले केले असून तसे गुन्हे दाखल आहेत.

म्हसवड परिसरात नदीकाठच्या शेतकऱ्यांनाही पैसे देऊन वाळू उपसली जात असून अनेक ठिकाणी मोठ-मोठे डेपो आहेत. रात्रभर या परिसरातील जनतेला ट्रक, डंपर, ट्रॅक्‍टर व जेसीबी साह्याने उपसा सुरू आहे. त्यांच्यावर गंभीर कारवाई का होत नाही? असे सवाल उपस्थित होत असुन प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे.ट्रकाभोवती तलाठ्यांच्या घिरट्या म्हसवड परिसरात वाळु चोरी मुळे अगदी तिस-चाळीस फुट खोल खड्डे पडले असुन दिवस-रात्र येथे वाळु उपसा सुरू आहे. पहाटे हातपाय आखडून येण्याची थंडी असताना एक तलाठी वाळू भरणाऱ्या ट्रकभोवती घिरट्या घालत असतो. मात्र कोणत्याही ट्रकवर कारवाई न करता खिसे गरम करून जात असतो.

बबलूवर ठेवला “अंकुश” !

गेल्या दोन महिन्यांपूर्वी महसुलच्या एका अधिकाऱ्यांची वसुली करण्याच काम माळशिरसच्या बबलू नामक व्यक्तींकडे देण्यात आले होते. परंतु अनेक वर्तमानपत्रांनी चांगला आवाज उठवल्या नंतर विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. सध्या तो बबलू परत गेला असुन त्यानंतर आता माणचा पुर्व भागातील “अंकुश” ठेवला आहे. तो एका अधिकाऱ्यांसाठी मंथली गोळा करत असल्याची चर्चा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)