रबर इंडस्ट्रीज असो’च्या अध्यक्षपदी मक्‍कर 

मुंबई: पुणे स्थित ओरिएंटल रबर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विक्रम मक्कर यांची ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (एआयआरआयए) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विक्रम यांना रबर उद्योगाचा 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे. मक्‍कर यांनी याआधी एआयआरआयएच्या तंत्रशिक्षण समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले असून आजवर त्यांनी एआयआरआयएफच्या उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.
मक्‍कर म्हणाले, एआयआरआयए पुढील वर्षाच्या सुरुवातीस इंडिया रबर एक्‍स्पो प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सज्ज होत असतानाच माझी या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हे प्रदर्शन आशियातील अशा स्वरूपाचे सर्वांत मोठे असून ते मुंबईत 17 ते 19 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे. हे प्रदर्शन आम्हाला याखेपेसही यशस्वी करुन दाखवायचे आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)