कॉंग्रेसला मत देणे म्हणजे पुन्हा मोदींनाच मजबूत करण्यासारखे

संग्रहित छायाचित्र...

दिल्लीच्या मतदारांना केजरीवालांचा इशारा

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करू नका कारण कॉंग्रेसला मतदान करणे म्हणजे पुन्हा मोदींनाच मजबूत करण्यासारखे आहे असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे दिल्लीतील मतदारांना केले आहे. दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र निवडणुका लढवण्याची शक्‍यता वर्तवली जात असताना केजरीवालांनी हे विधान करण्याला महत्व आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. त्यांनी भाजपलाही मतदान करण्यापासून मतदारांना सावध केले. ते म्हणाले की भाजपच्या दिल्लीतील सातही खासदारांनी दिल्लीसाठी काहींही केलेले नाही. त्यामुळे भाजपला मतदान करणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखे आहे असे ते म्हणाले.

दिल्लीत कॉंग्रेसने अध्यक्ष अजय माकन यांना बदलून शीला दीक्षित यांना त्यांच्या जागी आणण्याचे योजले आहे. त्या आम आदमी पक्षाशी जुळवून घेऊन दिल्लीत दोन्ही पक्षांमध्ये युती घडवून आणतील अशी चर्चा सुरू असतानाच केजरीवालांनी या संकल्पनेला सुरूंग लावला आहे असे सांगण्यात येते. आम आदमी पक्षाने लोकसभेच्या एकूण 33 जागा लढवण्याचे योजले असून त्यात त्यांनी दिल्लीतील सातही जागा लढवण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)