आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानातून शेती बनवू किफायतशीर (भाग १ )

ऊस पिकास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असून त्यावर आधारित साखर उद्योग शेतकऱ्यांच्या आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक प्रगतीचा अतिशय महत्वाचा भाग बनलेला आहे. कार्यक्षेत्रात गेल्या काही वर्षापासून विविध अडचणींमुळे ऊस उत्पादनात घट येऊ लागली आहे. ऊस उत्पादनात होत असलेली घट व उत्पादनाशी निगडीत कृषि निविष्ठांच्या वाढत्या किंमती यामुळे ऊस पिक आर्थिकदृष्ट्‌या किफायतशीर होत नसल्याचे दिसून येते.

ऊस उत्पादकांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेता ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी अतिशय रचनात्मक कार्यक्रम हाती घेऊन ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ न करता एकरी ऊसाचे उत्पादन व साखर उतारा वाढविणे हाच एक पर्याय आहे. त्यासाठीआधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्रिस्तरीय बेणे मळा, हंगामनिहाय ऊस लागवड व तोडणीचे नियोजन, हंगामनिहाय ऊस जातींची निवड, ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रियखते, हिरवळीची खते, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जिवाणू खते, किटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके इत्यादी निविष्ठांचा वेळीच पुरवठा करणे. यासाठी सतत प्रयत्नकरावे लागतील.

कार्यशेत्रातील समस्या व गरजा यावर आधारित तंत्रज्ञानाची माहिती या लेखात देण्यात आली आहे. आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन या लेखातून होईल अशी आशा आहे.

* माती परीक्षण : लागवड क्षेत्राच्या मातीचा नमुना तपासून घेऊन जमिनीमध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत व ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासठी कोणते घटक किती प्रमाणात असणे आवश्‍यक आहे याचा अभ्यास करून त्याप्रमाणे ऊस पिकाला खतांचे नियोजन करणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)