मेकअपने वाढते डोळ्यांचे सौंदर्य

आपल्या सौंदर्यात डोळ्याला खूप महत्व आहे. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांचे मेकअप फार काळजीपूर्वक केले पाहिजे. डोळ्यांचा मेकअप चांगला होण्यासाठी डोळ्यांची काळजी घेऊन तेथील स्नायू ताणमुक्‍त करणं महत्त्वाचं असतं.

व्यक्तिमत्त्वाचा आरसा म्हणून डोळ्यांकडे पाहिलं जातं. जर तुम्ही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाहीत. तर साऱ्या गोष्टी व्यर्थ आहेत. डोळ्यांच्या मेकअपसाठी मस्करा, आय-लायनर, आयशॅडो, गोलाकार स्पंजब्रश, त्रिकोणी केसांचा ब्रश (भुवयांसाठी), रबर स्टीक तंजीवरम, लॅश कलर, आय प्रोटेक्‍टिव्ह क्रीम, बदाम क्रीम (स्याह डाग साफ करण्यासाठी) आय-मेकअप रिमूव्हर क्रीम (काळे डाग साफ करण्यासाठी) पावडर, फाऊंडेशन इत्यादी सौंदर्यप्रसाधनांची गरज असते. ही सारी उत्पादनं बाजारात सहजपणे उपलब्ध होतात. ही उत्पादनं खरेदी करण्यापूर्वी त्यांची “एक्‍सपायरी डेट’ मात्र जरूर पहा. ही उत्पादनं खरेदी करण्यापूर्वी चांगल्या दर्जाच्या कंपनीचीच उत्पादनं खरेदी करा आणि आपल्या रंगरूपानुसारच त्यांची निवड करा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डोळ्यांसाठी मेकअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, डोळ्याचं नुकसान न करता त्याचं सौंदर्य वाढवावं. डोळ्यांना योग्य मेकअप करण्यासाठी त्याचबरोबर मेकअपमुळे योग्य आकार प्राप्त होण्यासाठी योग्य रंगांची निवड करणं देखील आवश्‍यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

डोळ्यांचा मेकअप सावकाश व सावधानतेने करावा. मेकअप करताना टोकदार पेन्सिलीचा वापर कधीही करू नका.

सर्वप्रथम बदामाच्या तेलाने डोळ्यांना मालीश करा. नंतर आय-प्रोटेक्‍टिव्ह क्रीम लावून डोळ्यांच्या मेकअपला सुरूवात करा. डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला कन्सीलर लावून काळे डाग लपविण्याचा प्रयत्न करा. याचा वापर फाऊंडेशनच्या खाली करा. आता त्वचेच्या रंगाशी मिळतीजुळती लूज पावडर डोळ्यांच्या भोवती पफने किंवा मऊ स्पंजने लावा.

आता आयशॅडोचा वापर करा. यामुळे डोळ्यांना रंग प्राप्त होऊन ते अधिकच सुंदर दिसू लागतात. जर तुमचे डोळे मोठे असतील तर फिकट रंगाच्या आयशॅडोचा वापर करण्यापूर्वी फाऊंडेशनचा हलका हात लावा. जर डोळे छोटे असतील तर गडद रंगाच्या आयशॅडोचा वापर करा. आयशॅडो लावताना नेहमी चपट्या केसांच्या ब्रशचा वापर करा. रात्रीच्या पार्टीच्या वेळी डोळे अधिक गडद दिसण्यासाठी ओल्या स्पंजच्या तुकड्यांचे आयशॅडो लावा. चंदेरी, सोनेरी व वांगी रंगाच्या आयशॅडोचा वापर करण्याऐवजी जास्त गडद व जास्त फिकट नसलेल्या रंगाची निवड करा.

आयशॅडो पापण्यांच्या वर बाहेरच्या बाजूने पसरेल अशा प्रकारे लावावा. आयशॅडो पापण्यांवर हलक्‍या हाताने लावा. मग पापण्यांच्या केसांवर गडद लावून, हलक्‍या हाताने पसरवा. यामुळे दोन्ही शेड छान मिसळतील. आयशॅडो लावताना नेहमी माशांच्या आकारासारखा निमुळता लावावा.

असा असावा आयलायनर : गोऱ्या रंगाच्या मुलींसाठी चॉकलेटी तर गव्हाळ रंगाच्या मुलींसाठी काळ्या रंगाचा आयलायनर शोभून दिसेल. त्यासाठी आयलायनर ऐवजी आयपेन्सिलीचादेखील वापर करता येईल. लक्षात ठेवा लायनर पापण्यांवरच्या केसांना चांगल्या रीतीने लावा. कानांजवळची त्वचा घट्ट पकडून ठेवा. त्यामुळे डोळ्यांच्या आसपासची त्वचा स्थिर राहील. नंतर पापण्यांपासून सुरुवात करून आतल्या आणि बाह्यत्वचेपर्यंत हळूहळू लावावं. हीच क्रिया डोळ्यांच्या बाहेरच्या कडेपासून ते डोळ्यांच्या मध्यापर्यंत परत करा. त्यानंतर करंगळीच्या बाजूच्या बोटाच्या मदतीने अलगदपणे पापण्याच्या केसांच्या वरच्या दिशेने पसरवा. डोळ्यांपासून काहीशा दूर अंतरावरूनच याचा वापर करा. असे जर डोळ्यांना जपले तर डोळ्यांचे सौंदर्य नक्‍की वाढेल.

– सुजाता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)