महेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…

नवी दिल्ली – विश्वचषक 2019 स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. आता धोनी वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे. त्याच्या निवृत्तीची चर्चा होत असली तरी तो पुढच्या वर्षी आयपीएल खेळून निवृत्ती जाहीर करू शकतो असंही म्हटलं जात आहे.

दरम्यान, माहितीनुसार भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली असून तो पुढील दोन महिने प्रादेशिक सेनेच्या सेवेत असणार आहे. धोनीला 2011मध्ये लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली होती.

भारतीय संघ 3 ऑगस्टपासून विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी उद्या भारतीय संघाची निवड होणार आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज बुमराह यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)