पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची मनोभूमिका तयार करा : मीनाक्षी राऊत

पुणे – यंदाच्या दिपावली उत्सवाला पर्यावरण परूक बनवूयात आणि फटाकेमुक्‍त दिवाळी साजरी करून पर्यावरणाला वाचवूयात. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची मनोभूमिका तयार करा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना केले आहे.

दिपावलीच्या आनंदोत्सवाचे काळात फटाक्‍यांच्यापेक्षा एकमेकास पुस्तके, दिवाळी अंक इत्यादी खरेदी करून विद्यार्थ्यांना साहित्याने समृद्ध करूयात. व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅंटमिटन, क्रिकेट इत्यादी खेळाचे साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास करूयात. विद्यार्थ्यांना कला, संगीत क्षेत्रात त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध वाद्ये खरेदी करा, असेही आवाहनही दिपावली उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या उत्सवाचा आनंद घ्यायला मुलांना शिकवाच, पण त्याचबरोबर अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा बदलवण्याचे सामर्थ्यही त्यांच्यामध्ये निर्माण करा. शिवाय त्यांना आधुनिकतेची कास धरण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक जिव्हाळा, नाती यांचा आदर करण्याची शिकवण मुलांत रूजूवात, असेही राऊत यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर भावी पिढीला स्वच्छतेचे अनमोल शिक्षण आपल्या रोजच्या जीवनशैलीतून देऊन त्यांना सुदृढ आणि समृद्ध जीवन देण्याचा अन्‌ प्रदुषणमुक्‍त करण्याचा प्रयत्न करूयात, असेही त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)