‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’

पुणे – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व संस्थांनी आपल्या संकेतस्थळावर विद्यार्थी, शिक्षक व संबंधितांसाठी ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाईन तक्रार निवारण कार्यपद्धती प्रणालीविषयी सविस्तर मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांनाही या प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक दिले आहेत.

शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांमध्ये अद्यापही ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली कार्यान्वित केली नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व संस्थांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांनी याबाबत त्वरित कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. ही बाब सर्वांना अवगत होण्यासाठी संस्थेच्या प्रसिद्धीफलकावर, दर्शनीय ठिकाणी कायमस्वरुपी प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयास सादर करावा, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी संस्थास्तरावर पर्याय उपलब्ध असतो. मात्र, ऑनलाइन तक्रार करण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन तक्रार नोंदविता येत नाही. आता तंत्रशिक्षणने सूचना दिल्याने सर्व संस्था आपल्या संकेतस्थळावर ही कार्यप्रणाली सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)