‘मेड इन इंडिया’ ते ‘स्मार्ट इंडिया’ (भाग-१)

स्मार्ट सिटी म्हणजे केवळ शहर स्मार्ट दिसणे नव्हे, तर शहरात स्मार्ट सुविधा असणे होय. या सुविधा एका विशिष्ट वर्गालाच न मिळता सर्वसामान्यांनाही मिळायला हव्यात. काय आहेत या सुविधा व कशा मिळतील?

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. याचा परिपाक म्हणजे आजघडीला भारताने केवळ जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली नाही तर आपला देश विकसित देशांच्या पंक्तीत बसण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत अन्य देशातील शहरांप्रमाणे आपल्याकडेही अत्याधुनिक शहरे असणे, विकास होणे गरजेचे आहे. लोकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या स्मार्ट शहरांची नितांत गरज निर्माण झाली आहे. चित्रपटातून किंवा सहलीच्या माध्यमातून आपण परदेशातील नेत्रसुखद शहरांचा अनुभव घेतो. अशीच शहरे आपल्याकडे असावीत, अशी मनोमन इच्छा असते. सध्याची शहरे ही कचऱ्याचे ढिग, वाढते प्रदूषण, लोकसंख्येचा स्फोट, वाहतूक कोंडी यात गुरफटलेली आहेत. यातून बाहेर काढण्यासाठी सरकारी पातळीवरच नाही तर वैयक्तिक पातळीवर देखील इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे आहे. अत्याधुनिक सुखसुविधा असलेल्या शहरातील वास्तव्याने जीवनमान आणि राहणीमान उंचावेल, यात शंका नाही. आजकाल उच्चभ्रूू सोसायटीत असणाऱ्या पंचतारांकित सुविधा सामान्यांनाही मिळाव्यात यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

‘मेड इन इंडिया’ ते ‘स्मार्ट इंडिया’ (भाग-२)

-Ads-

आपल्या देशात भविष्यात मोठ्या संख्येने स्मार्ट शहरे उभारली आणि विकसित झाली तर निश्चितच भारताची वाटचाल विकसित देशांकडे होईल आणि नव्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. आपल्या शहरांना स्मार्ट करणाऱ्या योजनांसमोर अनेक आव्हाने आहेत आणि ते आव्हान पेलल्याशिवाय स्वप्नातील शहर साकार होणे अशक्य आहे. स्मार्ट सिटीच्या मोठ्या प्रकल्पात स्मार्ट सिटी सोल्युशन्सबरोबर दोन वर्षांपासून योगदान देणाऱ्या अजीवी टेक्नॉटलॉजीचे संस्थापक आणि विशेषतज्ज्ञ विशाल गुप्ता यांच्या मते, भारतासारख्या देशात स्मार्ट सिटीज उभारण्यासाठी कायद्यात परिवर्तन करण्याबरोबरच तांत्रिक संबंधी सर्वच क्षेत्रात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नाही तर स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट, स्मार्ट सोलर एनर्जी, स्मार्ट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट, स्मार्ट एज्युकेशन अँड हेल्थकेअर, स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट, स्मार्ट अॅॅग्रीकल्चर अँड फार्मर मॅनेजमेंट सारख्या विषयांवर गांभीर्याने काम करावे लागेल.

– कमलेश गिरी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)