‘मेड इन इंडिया’ ते ‘स्मार्ट इंडिया’ (भाग-२)

स्मार्ट सिटी म्हणजे केवळ शहर स्मार्ट दिसणे नव्हे, तर शहरात स्मार्ट सुविधा असणे होय. या सुविधा एका विशिष्ट वर्गालाच न मिळता सर्वसामान्यांनाही मिळायला हव्यात. काय आहेत या सुविधा व कशा मिळतील?

‘मेड इन इंडिया’ ते ‘स्मार्ट इंडिया’ (भाग-१)

भारतात यासंदर्भात कोणकोणत्या स्रोतांच्या आधारे स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार होऊ शकते, ते आपण पाहूया.

-Ads-

स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट :
स्मार्ट ट्रॅकिंग सिस्टिमच्या माध्यमातून एक मजबूत स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट तयार करता येईल. यानुसार घराबाहेर एक चिप बसवली जाईल. घराघरातून कचरा नेणाऱ्या गाडीचा सहायक हा कचरा उचलताना त्या चिपला टच करेल आणि संबंधित घरातून किती कचरा नेला याची माहिती आपोओप पालिकेकडे जमा होईल. अशा रितीने दिवसभरात किती घरातून किती कचरा गोळा केला, याचे रेकॉर्ड महानगरपालिकेकडे राहील. त्यानंतर सोसायटी किंवा गल्लीतील कचरापेटीतून कचरा काढला जाईल आणि तेथेही बसवलेल्या चीपला संबंधित कर्मचारी टच करेल. हीच मशीन कचरा डेपो किंवा डम्पिंग यार्ड आणि लॅंडफिल साईटसवरही बसवली जाईल. सेंन्सरयुक्त चिपचे एक वैशिष्ट्ये असेल, ते म्हणजे कचरा डेपो किंवा डम्पिंग यार्डमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कचरा जमा झाल्यास मोबाईल किंवा वेबसाईटवर एक संदेश आपोआप येईल, तो म्हणजे मला रिकामे करा.

स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट :
भारतात अनेक मुलभूत समस्या आहेत आणि त्यापैकीच एक पाण्याची समस्या. आपल्याकडे पाण्याची बचत कमी आणि वाया घालवण्याचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येचा दबाव, नैसर्गिक स्रोतांची हानी, गैरव्यवस्थापन आदी कारणांमुळे भारतात पाण्याची समस्या कायम राहिलेली आहे. चांगला पाऊस पडूनही पाण्याची योग्य साठवणूक होत नसल्याचे किंवा साधन उपलब्ध नसल्याने भरपावसाळ्यातही पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते. या संकटाचा सामना करण्यासाठी स्मार्ट सिटीत स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटचे नियोजन करावे लागेल. या मॅनेजमेंटनुसार पाणीपुरवठ्यातील गुणवत्तेत सुधारणा करणारे एक डिव्हाईस बसवले जाईल. हे डिव्हाईस आपल्याला पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे, हे सांगण्याचे काम करेल. दूषित पाणी असल्यास हे डिव्हाईस तत्काळ बीप करेल आणि नागरिकांना अॅॅलर्ट देईल. शहरात किती बेकायदा कनेक्शन आहेत आणि कोठे कोठे पाण्याची गळती आहे या सर्व बाबी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्क्रिनवर दिसू लागतील. एवढेच नाही तर घरात बसवलेल्या पाण्याच्या मीटरचे बिल आपोआप तयार होईल आणि बिलाशी निगडित असलेली सर्व माहिती जसे की, पाण्याचा वापर, मागील बिल, बिलाचा भरणा आदी माहिती मोबाईलवर मिळेल.

स्मार्ट सोलर एनर्जी :
एका स्मार्ट सिटीत स्मार्ट सोलर एनर्जी म्हणजेच सौरऊर्जा असणे अत्यंत गरजेचे आहे. या माध्यमातून दररोज वापरात येणारे पथदिवे, सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे दिवे, लिफ्ट, पंखे आदींसाठी सौरऊर्जेचा वापर करता येईल. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर केल्यास विजेचा खप कमी होईल. वाढत्या वीजबिलावर आपण सौरऊर्जेच्या मदतीने काही प्रमाणात अंकुश ठेऊ शकतो.

स्मार्ट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट:
वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या ही सर्वसाधारण आहे. या प्रश्नाचे खापर सरकार वाहनांच्या वाढत्या संख्येवर फोडत आहे; परंतु सध्याची सदोष वाहतूक व्यवस्था जबाबदार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या मते, जर सध्याच्या व्यवस्थेला स्मार्ट ट्रान्स्पोर्ट सिस्टिममध्ये परावर्तीत केले तर काही प्रमाणात अडचणी कमी होऊ शकतात. बस डेपोत स्मार्ट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंटसाठी स्मार्ट फ्लीट मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर केल्याने बस आणि चालकांच्या संपूर्ण डेटाचे संगणकीकरण होऊन संपूर्ण डेपोचे स्मार्ट डेपोत रूपांतर होऊ शकते.

स्मार्ट एज्युकेशन अँड हेल्थकेअर:
एका स्मार्ट सिटीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला अन्य क्षेत्रांप्रमाणेच स्मार्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आयओटीच्या माध्यमातून मुलांना स्मार्ट एज्युकेशन प्रदान केले जाईल. त्यात सर्वप्रकारच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण आणि शाळेशी निगडित सर्व महत्त्वाची माहिती जसे की मुलांची वर्षभरातील कामगिरी, मुलांवरील रिमार्क आदी बाबी पालकांपर्यंत सहजपणे पोचू शकतील. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात देखील सुटसुटीतपणा येईल. त्यात पेशंटचा डेटा डॉक्टरांकडे सुरक्षित राखला जाईल आणि या माध्यमातून डॉक्टरला आजाराचे कारण तत्काळ कळणे सोपे जाईल. गरज पडल्यास कोणते तंत्रज्ञान कोठे उपलब्ध आहे त्याचा शोध सहजपणे घेता येईल. याशिवाय रुग्णवाहिकेचे ठिकाण, डॉक्टपर आणि औषधांची उपलब्धता सहजपणे शोधू शकतो.

स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट:
लोकसंख्येच्या समस्येबरोबरच पार्किंगची समस्या देखील आज मोठा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यात स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट हाच त्याचा शेवटचा उपाय आहे. या स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंटच्या तंत्राच्या आधारे आपण घरातून निघताना ज्या ठिकाणी पोचणार आहोत, तेथील पार्किगची स्थिती समजण्यास मदत मिळेल. या आधारावर गाडी घराबाहेर कधी काढावी, हे आपल्याला घरबसल्या समजेल आणि पार्किंगवरून होणारी हाणामारी कमी होईल.

– कमलेश गिरी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)