देशभरातील व्यापाऱ्यांची एक व्होट बॅंक बनवणार : फेब्रुवारीत मोहीम सुरू

नवी दिल्ली: देशभरातील व्यापाऱ्यांची एक व्होट बॅंक बनवण्याचा विचार चाललेला आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून मोहीम सुरू करण्यात येणार आहे. अलीकडेच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांनी वेगवेगळ्या वर्गांना वेगवेगळे संदेश दिले आहेत. राजकीय पक्षांना तर धडे मिळालेच आहेत, पण शेतकऱ्यांनी एकीचे महत्त्व जाणले आहे.

शेतकरी आणि सामान्यजनांनी एकत्र येऊन मतदान केले, तर राजकीय पक्षांना त्त्यांचे म्हणणे मानावे लागणार आहे. त्याच प्रकारे जर देशभरातील सर्व व्यापारी एक झाले, त्यांनी आपली व्होट बॅंक बनवली, तर त्यांना आपल्या मागण्या मान्य करून घेणे शक्‍य होणार आहे. त्यांचे म्हणणे-ऐक़णे राजकीय पक्षांना बाध्य होणार आहे. त्या दृष्टीन व्यापारी संघटना कॅट (कॉन्फरिगेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) ने प्रयत्न सुरू केले आहेत. शेतीनंतर सर्वाधिक लोकांना स्थानिक व्यापारीच रोजगार पुरववतात. सर्वाधिक करभरणा करतात. मात्र तरीही सरकार निर्णय घेताना त्यांच्यापेक्षा मल्टिनॅशनल्स चा विचार अगोदर करते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या संदर्भात भोपाळ्मध्ये दोन दिवसांच्या एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्‌द्‌याला धरून एक व्यापारी-एक मत हे अभियान चालू करणार आहेत. देशभरात सुमारे 7 कोटी व्यापारी आहेत. ते सुमारे 45 कोटी लोकांना रोजगार पुरवतात. दरवर्षी सुमारे 42 लाख कोटी रुपयांची उलाढाल करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)