अयोध्या – शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे उद्या शिवसेनेच्या १८ नवनिर्वाचित खासदारांसह अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचं दर्शन घेतलं लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत अयोध्येचा दौरा केला आहे. दरम्यान, रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे. हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे. पहिले मंदीर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत असं त्यांनी सांगितले.
Shiv Sena chief Uddhav Thackeray in Ayodhya: From tomorrow Lok Sabha Session will begin so before entering the Parliament all Shiv Sena MPs have come here to take the blessings of Ram Lalla. We strongly believe that temple will be constructed at the earliest. pic.twitter.com/x4zQNlTnV1
— ANI UP (@ANINewsUP) June 16, 2019