काश्‍मीरमधील चकमकीत मेजर शहिद

एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर- जम्मू काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये आज झालेल्या चकमकीमध्ये लष्कराचा एक मेजर शहिद झाला. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्माही करण्यात आला. अन्य एक लष्करी अधिकारी आणि 2 जवानही आजच्या चकमकीमध्ये जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या आछाबल भागात ही चकमक झाली. जखमींना श्रीनगर येथील लष्कराच्या 92 बेस रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. घटनास्थळावरून दारुगोळा जप्त करण्यात आला असून चकमकीत ठार झालेल्या अज्ञात दहशतवाद्याचा मृतदेहही सापडला आहे. या दहशतवाद्याचे नाव आणि त्याच्या गटाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज सकाळी सुरक्षा दलांनी या परिसरामध्ये नाकाबंदी करून मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम सुरू होती. त्या शोधमोहिमेदरम्यान सुरक्ष दल आणि दहशतवाद्यामध्ये ही चकमक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)