अनधिकृत खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली

-वाई शहरातील प्रकार
-लाखो लिटर
-पाणी वाया
-पालिका गुन्हा दाखल करणार?

वाई – वाईतील शिवाजी चौकात नगरपालिकेच्या जागेत अनधिकृत खोदकामामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेची मुख्य पाईपलाईन तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. वाईतील शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी लाखो लिटर वाया गेले आहे. यामुळे सिद्धनाथवाडी, दत्तनगर, प्राध्यापक कॉलनी या भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. नगरपालिकेच्या मुख्य चौकालगत पालिकेची मोकळा भूखंड असून यामध्ये खासगी मालक जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतपणे मोठी चर खोदत होता.

पालिकेच्या कोणत्याही विभागाला याची कल्पना नसावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही. दरम्यान दुपारी चार वाजता चर खोदत असताना पाईपलाईन फुटली व त्यामधून सुमारे पाण्याचे फवारे उडू लागल्याने बघ्यांची गर्दी उडाली. स्थानिक नागरिकांनी पालिकेला घटनेबाबत माहिती दिल्याने कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्वरित पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पालिका प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्याचे समजले. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणू देता त्यांनी संबंधित खोदकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तथापि, या प्रकाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याचे संकट लक्षात घेऊन तुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, अन्यथा पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)