दहशतवाद्यांविरोधात भारतीय सेनेचे मोठे ऑपरेशन 

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आज भारतीय सेनेतर्फे दहशतवाद्यांविरोधात एक मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सेनेने तीन शोधमोहिमा आखल्या आहेत.

आज सकाळपासूनच भारतीय जवान मोठ्या संख्येने या दहशतवाद्यांचा शोध घेत असून आज सकाळी या लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बारामुल्लातील सोपोर भागामध्ये शोध मोहिमेत सामील असलेल्या पोलिसांवर हल्ला चढवला होता या हल्ल्यामध्ये दोन पोलिस जखमी देखील झाले होते. सोपोर येथे दोन दहशतवादी लपून बसले असल्याचा अंदाज असून भारतीय सेनेतर्फे त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)