कुवेतमध्ये मानवतस्करी संबंधी मोठी कारवाई

कुवेत – कुवेतमध्ये मानवतस्करी संबंधी कारवाई करण्यात आली असून गृह मंत्रालयाने विविध देशातून आलेल्या सुमारे 3000ंव्यक्तींच्या अटकेचा आदेश दिला आहे. मानवी तस्करीसंबंधी कुवेतमधील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

अटक करण्यात आलेल्या या लोकांनी कुवेतमध्ये काम करण्यासाठी काही काल्पनिक कंपन्यांना पैसे दिल्याचे आणि फ्री व्हिसा साठी पैसे दिल्यानंतर त्यांना कुवेतमध्ये कोठेही काम करण्याची परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी मान्य केले. अशा प्रकारे कुवेतमध्ये आलेल्या लोकांमध्ये पाकिस्तानी नागरिकांचे प्रमाण सर्वात जास्त असून त्या खालोखाल बांगला देशी आणि इजिप्तचे नागरिक आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुवेत समाचार एजन्सी “कुना’ कडून मिळालेल्या माहितीनुसार बनावट व्हिसाचा वापर करून सुमारे 3000 परदेशी कामगारांना कुवेतमध्ये आणण्यात आले आहे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे परदेशी कामगारांना कुवेतमध्ये आणण्याचे काम करणाऱ्या तीन कंपन्यांच्या मालकांना जामिनावर सोडण्यात आले आहे. या प्रकरणचा मास्टर माईंड समजल्या जाणाऱ्या एका सीरियन नागरिकाला मात्र अटकेत ठेवण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)