भारताला मोठे यश : मसूद अझरच्या सर्व मालमत्ता फ्रान्स करणार जप्त 

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला चीनने विरोध केला आहे. परंतु, फ्रान्सने भारताची साथ देत मोठे पाऊल उचलले आहे. मसूद अझरच्या फ्रान्समध्ये असणाऱ्या सर्व मालमत्ता तेथील सरकारकडून जप्त करण्यात येणार आहे. फ्रान्सच्या या निर्णयाकडे भारताचे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.

-Ads-

दरम्यान, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझर या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील आहे मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जातो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)