सोलापूरातील नरबळीप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

सोलापूर: सोलापूरमधील मंगळवेढ्यातील बहुचर्चित नरबळी प्रकरणी मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे. प्रतिक शिवशरण या 9 वर्षीय चिमुरड्याची हत्या करून नरबळी दिल्याचा प्रकार आता उघडकीस आला होता. त्यानंतर या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.

मंगळवेढा तालुक्‍यातील माचणूर येथे राहणाऱ्या प्रतीक मधुकर शिवशरण (वय 9) या शाळकरी मुलाचे गतवर्षी 28 ऑक्‍टोबर 2018 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सहा दिवसांनी माचणूर गावच्या शिवारात प्रतीकचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्‍याचे केस कापलेले, डावा पाय तोडून गायब केलेला आढळून आला होता. तसेच हिरव्या रंगाची चोळी, बांगडयाही मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या गुन्ह्यात यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एक अल्पवयीन आरोपी अटकेत होता. त्यानंतर आता मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली. मंगळवेढ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, गिरी गोसावी, अरुण सावंत आदींनी गुन्ह्याचे धागेदोरे उकलण्यात भूमिका बजावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

1 COMMENT

  1. एकविसाव्या शतकात देखील लोक अजून इतके अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत .शिवबा ,फुले ,शाहू व आंबेड्करांच्या महाराष्ट्रात अजूनही नरबळी दिला जातो हि शोकांतिका आहे.शिवबा ,फुले ,शाहू व आंबेड्करांच्या महाराष्ट्रात जनतेला अजून प्रभोधनाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)