महिंद्राचा स्वित्झर्लंडमधील गामया कंपनीशी करार

मुंबई – महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्‍टर (एफईएस) या कंपनीने गामया या स्वित्झर्लंडमधील कृषी तंत्रज्ञान कंपनीमध्ये 11.25% हिस्सा खरेदी करण्यासाठी 4.3 दशलक्ष डॉलर गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे, महिंद्रा आपल्या फार्मिंग 3.0 धोरणाच्या अनुषंगाने, जागतिक शेती क्षेत्राला सहज उपलब्ध होतील, अशी दर्जेदार फार्मिंग सोल्यूशन्स निर्माण करणार आहे.

कंपनीचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, या भागीदारीमुळे आम्हाला अत्याधुनिक शेती क्षमता विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. गामयाचे सहसंस्थापक योसेफ अख्तमन यांनी नमूद केले की, शेती हा अतिशय क्‍लिष्ट उद्योग असून त्यामध्ये कार्यक्षमता व शाश्‍वतता या दृष्टीने झपाट्याने परिवर्तन होत आहे. मशीन लर्निंगसह प्रगत तंत्रज्ञानाचे फायदे जगभरातील शेतकरी व अल्पधारक यांना देण्यासाठी गामयाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने महिंद्राने एक भागीदार म्हणून सहभाग घेतला आहे. गामया विशिष्ट पिकांच्या अनुसार तंत्रज्ञान उपलब्ध करते. कंपनी ब्राझीलमध्ये कार्यरत आहे आणि भारत, युक्रेन व अन्य देशांत कंपनीचे अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)