माहीम दर्गा, कबरीस्तान साफ करा ; उच्च न्यायालयाची चौघा तरूणांना अनोखी शिक्षा

मुंबई: माहीम दर्गा ऊरूसच्या वेळी मारहाण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतलेल्या चार तरूणांना उच्च न्यायालयाने अनोखी शिक्षा देत गुन्हा रद्द केला. चौघा आरोपींनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप आणि दोघा तरूणांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करता मार्च महिन्याच्या चार रविवारी माहीम दर्गा आणि माहीम कबरीस्तानाची सफाई करण्याचे निर्देश दिले.या प्रकरणात दोघे हिंदू असल्याने न्यायालयाने त्यांचा जर या शिक्षेला आक्षेप असल्यास सिध्दीविनायक मंदीर साफ करण्याचा पर्याय खुला ठेवला.

डिसेंबर-2017मध्ये माहीम दर्गाच्या ऊरूसदरम्यान काही शुल्लक कारणावरून चार तरूणांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे रूपांतर हाणामारीत घडले. चौघांनीही एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी चारही तरूणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहीते-डेरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी न्यायालयीन मित्र म्हणून ज्येष्ठ वकील ऍड. रिझवान मर्चंट यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या चारही तरूणांचे वय लक्षात घेता आणि घडलेल्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता त्यांना कठोर शिक्षा देऊ नये. शक्षैणिक नुकसान होणार नाही, अशी विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत न्यायालयाने पोलिसांनी गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले. मात्र कायद्याची जबर बसावी म्हणून त्याच परीसरातील माहीम दर्गा आणि माहीम कबरीस्तान चार रविवार साफ करण्याची शिक्षा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)