सलमान खान ‘या’ चित्रपटामधून महेश मांजरेकरांच्या मुलीला लॉन्च करणार

बॉलिवूडचा दबंग सलमान खान दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी अश्वमी मांजरेकरला लवकरच लॉन्च करणार आहे. आपल्या आगामी दबंग-3 मध्ये लॉन्च करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खानने अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हांची मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत काम केले आहे. आता महेश मांजरेकरांच्या मुलीसोबतही सलमान रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 2010 मध्ये दबंगमधून सोनाक्षी सिन्हाला सलमानने ब्रेक दिला होता. दबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांच्या कन्येला सलमान ब्रेक देणार आहे.

 

View this post on Instagram

 

He doesn’t know this picture is on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on

दबंग-3 च्या निर्मात्यांना या सिनेमासाठी आणखी एक अभिनेत्री हवी होती. यासाठी आधी मौनी रॉयचे नाव चर्चेत होते. मात्र मौनीने नकार दिल्यानंतर अश्वामी मांजरेकर या सिनेमात दिसणार आहे. अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर हे खूप चांगले मित्र आहेत. सलमानला जेव्हा कळले की महेश मांजरेकरांची मुलगी बॉलीवूडमध्ये काम करु इच्छिते, तेव्हा लगेच सलमानने तिला लॉन्च करण्याचे प्लानिंग बनवले. अश्वमीची भूमिका या सिनेमात कोणती असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नसली तरीही सोनाक्षीच्या बरोबरीचा रोल तिला देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Brat

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)