साजिद खानवर महेश भूपती भडकला 

बॉलिवूडमध्ये “मी टू’ अभियान जेंव्हापासून सुरू झाले तेंव्हापासून मोठ्या प्रोड्युसर आणि डायरेक्‍टरांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये साजिद खानचेही नाव होते. महिलांचा अनादर करण्याचा त्याच्यावर आरोप होता. एका ऍक्‍ट्रेसने त्याच्यावर अश्‍लील वर्तनाचे आरोप केले होते. आता टेनिसपटू महेश भूपतीनेही साजिद खानच्या अश्‍लील वर्तनावर टीका करणारी एक लांबलचक पोस्ट केली आहे. महेश भूपती हा ऍक्‍ट्रेस लारा दत्ताचा पती आहे. लाराने आपल्याला साजिद खानच्या अश्‍लील वर्तनाबाबत सांगितले होते, असे त्याने या पोस्टमध्ये लिहीले आहे.

साजिद खान शुटिंगच्या सेटवर महिलांशी अगदी असभ्यपणे बोलायचा. खूप घाणेरड्या विषयांवर गप्पा मारायचा, असे लाराने आपल्याला सांगितल्याचेही भूपतीने म्हटले आहे. डेटिंग सुरू असताना लारा “हाऊसफुल्ल’चे शुटिंग करत होती. तेंव्हा लारा आणि तिची हेअर ड्रेसर मैत्रीण नेहमी साजिद खानच्या वर्तनाबाबत तक्रार करत असायच्या. त्यावर सर्व अभिनेत्रींनी जर या गोष्टीला विरोध केला नाही, तर या वर्तनाला तुम्हीच जबाबदार आहात, असे महेश भूपतीने त्या दोघींना सांगितले होते. महेशचे हे म्हणणे लाराला काही अंशी पटलेही होते. आता साजिद खानला “हाऊसफुल्ल 4’च्या डायरेक्‍शनपासून हटवण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)