महेश बाबूच्या ‘महर्षि’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित

सुपरस्टार महेश बाबू याने आपल्या 43 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘महर्षी’ या आगामी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. त्याने #MAHARISHI असा ट्रेंड ट्विटरवर सुरू करत या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे. हा ट्रेंड चांगलाच हिट होत असून सध्या ट्विटरवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महेशला त्याच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच पोस्टरलाही चांगलीच पंसती दर्शवली आहे. महेश बाबू हा साऊथ चित्रपट इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. महेशचा यापूर्वीचा चित्रपट ‘भारत एएन नेनु’ ने बाॅक्स आॅफिस वर 200 कोटीची कमाई केली होती. चित्रपटाच्या निर्मात्याने महर्षी चित्रपटाचा ट्रिझरदेखील प्रदर्शित केला आहे. महेश बाबू या चित्रपटामध्ये ‘ऋषि’ नाव असलेल्या पात्राची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये तो हातात लॅपटाॅप घेऊन चालताना दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महेश बाबू ने ट्विट केले आहे की, ‘ऋषि चा नवीन प्रवास सुरू करत आहे’. हे पोस्टर प्रदर्शित होताच ट्विटरवर हिट होत आहे. त्याच्या चाहत्यांनी पोस्टरला चांगलीच पंसती दिली असून त्याचबरोबर आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील देत आहे.

संबंधित बातमी  #HBD भारतीय तेलुगू चित्रपट अभिनेता महेश बाबू


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)