महिंद्राची मॅराझो करणार टोयोटा क्रिस्टाशी स्पर्धा 

मुंबई: महिंद्रा कंपनीची प्रवाशी वाहन क्षेत्रात आगेकूच करण्याची महत्त्वाकांक्षा वाढत असून आता कंपनी सप्टेंबर महिन्यात बहुउपयोगी वाहन मॅराझो सादर करणार असून या वाहनाची बाजारात अगोदर आघाडीवर असलेल्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टाशी स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे.
7 ते 8 प्रवाशी क्षमता असणाऱ्या या गाडीवर कंपनीच्या अमेरिकेतील केंद्रात आणि चेन्नईतील संशोधन केंद्रात संशोधन झाले आहे. तर ही गाडी नाशिक येथील प्रकल्पात तयार करण्यात येत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे वाहन जागतिक बाजारपेठेसाठी तयार करण्यात आले आहे.
यासाठीची गुंतवणूक आणि गाडीची शक्‍य किंमत सांगण्यास गोयंका यांनी यावेळी नकार दिला मात्र एकदम नवे वाहन तयार करण्यासाठी 800 ते 1600 कोटींची गुंतवणूक लागते असे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या अखेरीस कंपनी आणखी दोन गाड्या सादर करणार आहे. शार्क ही प्रेरणा असलेल्या मॅराझोमुळे महिंद्रच्या आगामी उत्पादनांची दिशा निश्‍चित होत आहे. पिनिनफरीना, महिंद्र डिझाईन स्टुडिओ, एमएनएटीसी आणि महिंद्र रिसर्च व्हॅली या सर्वांनी परिश्रम घेतले आणि ग्राहकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन त्यांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन देण्याच्या दृष्टिकोनातून मॅराझो तयार करण्यात आली. मॅराझोची बांधणी व तिचा विकास यांची प्रक्रिया लक्षात घेता, जागतिक श्रेणीतील इतर कोणत्याही वाहनाची मॅराझोशी तुलना करता येईल. गुणवत्ता, तंत्रज्ञान, चाचणी आणि वैधता मानदंड, सुरक्षितता, विनियम आणि वायूंचे उत्सर्जन या जागतिक मानकांनुसार महिंद्रा मॅराझो ही एक बेंचमार्क बनलेली आहे, असा दावा त्यानी केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)