लंडन – शांतचित्त लाभलेला खेळाडू साऱ्या जगात ख्यातनाम असलेला महेंद्रसिंग धोनी येथे सध्या तो वापरत असलेल्या ग्लोजमुळे चर्चेत आहे. भारताच्या प्रादेशिक सेनेचे बोधचिन्ह असलेले ग्लोज तो वापरत असून त्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आक्षेप घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) व्यवस्थापन समितीचे मुख्य विनोद राय यांनी याबाबत आयसीसीकडे परवानगी मागितली आहे.
धोनी याची प्रादेशिक सेनेचा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला या दलातील पॅराशूट रेजिमेंटमधील लेफ्ट्नंट कर्नल हा सन्मान देण्यात आला आहे.् आपली ही नियुक्ती हा सन्मानाचाच व देशाकरिता प्रतिष्ठेचा भाग असल्यामुळे हेच ग्लोज वापरण्यावर धोनी हा ठाम आहे. हे ग्लोज वापरण्यामुळे स्पर्धेतील विविध बोधचिन्हांबाबत असलेल्या नियमावलीचा भंग होत आहे असा आक्षेप आयसीसीने घेतला आहे. धोनी याला असे ग्लोज वापरण्यास मनाई का करु नये असे आयसीसीने बीसीसीआयला कळविले आहे.
याबायाबाबत राय यांनी सांगितले, खेळाडूंच्या विविध पोशाखांवरील बोधचिन्हे. काही धार्मिक चिन्हांबाबत आम्ही यापूर्वीच आयसीसीकडे परवानगी मागितली आहे. आमच्या कोणत्याही खेळाडूकडून आयसीसीच्या नियमावलींचा भंग होणार नाही याची आम्ही नेहमीच काळजी घेत असतो. धोनी वापरत असलेल्या ग्लोजवर असलेले बोधचिन्ह हे कोणत्याही स्वरुपाची जाहिरात नाही. प्रादेशिक सेना हा आमच्या देशाच्या सैन्यदलाचाच एक भाग आहे. या बोधचिन्हामुळे कोणच्याही धार्मिक, राजकीय किंवा जातीय भावना दुखावल्या जात नाहीत.