सामना ‘टाय’  होण्याबाबत धोनीच्या नावे असा ‘एक’ विक्रम  

file pic

दुबई – आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोरच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचे कर्णधार पद सांभाळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा हा दोनशेवा सामना ठरला. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शिखर धवन यांना विश्रांती दिल्यानंतर धोनीला संघाचा कर्णधार करण्यात आले पण त्याचा हा 200 वा सामना त्याच्यासाठी संस्मरणीय ठरला, कारण महेंद्रसिंग धोनीने अनेक विक्रम स्वत च्या नावे केले आहेत.

महेंद्रसिंग धोनीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 200 वा सामना ठरला. धोनीने 696 दिवसानंतर कर्णधार म्हणून 200 वा सामना खेळला. त्याने 29 आॅक्टोबर 2016 ला न्यूझीलंड विरूध्द विशाखापट्टनम येथे कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामना टाय संदर्भात धोनीचा असा एक विक्रम

सामना टाय होण्याच्या संदर्भातील विक्रमाबदल सांगायचे झाले तर महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट विश्वातील एकमेव कर्णधार आहे, की संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना त्याच्या कर्णधारपदाखाली एकूण 5 सामने टाय झाले आहेत. क्रिकेट विश्वात असा विक्रम कोणाच्याच नावावर नाही. इतर कर्णधाराच्या बाबतीत सांगायचे झाले तर आर रिचर्डसन, स्टीव वाॅ आणि शाॅन पाॅलाक यांच्या नेतृत्वाखाली 3 एकदिवसीय सामने टाय झाले आहेत.

अफगाणिस्तान 14 वा असा देश झाला आहे की, ज्याच्या विरुध्द महेंद्र सिंग धोनीने एकदिवसीय सामन्यात कर्णधार पद संभाळले आहे. याआधी भारताच्या कोणत्याच कर्णधाराने ही कामगिरी केलेली नाही. त्यांच्यानंतर सौरभ गांगुलीचा नंबर लागतो , त्याने 13 देशाच्या विरूध्दात कर्णधापद संभाळले आहे.

तसेच अफगाणिस्तान विरूध्द 200 व्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार पद संभाळताना महेंद्र सिंग धोनी एका विशेष क्लबमध्ये सामिल झाला आहे. त्याच्या आधी रिकी पाॅन्टिंग (203) आणि स्टीफेन फ्लेमिंग (218) यांचा क्रमांक लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)