महावितरण प्रशासनाची “हायटेक वाटचाल’

पुणे – महावितरण प्रशासनाने हायटेकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यात ऑनलाईनसह अन्य सुविधा सुरू केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचे काम एका क्‍लिकवर होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या वतीने त्यांच्या वीजवापराच्या रिडिंगचा एसएमएसही ग्राहकांना मोबाईलवर मिळू लागला आहे.

दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने नोटबंदीचा निर्णय जाहीर करून कॅशलेस सुविधा सुरू करण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महावितरण प्रशासनाने त्यांच्या सर्व कार्यालयात तत्काळ ही सुविधा आणि त्यांच्या सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यावेळी हजारो ग्राहकांना त्याचा फायदा झाला होता.
वीजबीलांच्या तक्रारी आणि त्यातून घडणारे वादविवाद हे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी नवीन बाब नव्हती; त्याची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने मोबाईलवर रिडिंग घेण्याची सुविधा सुरू केली. त्यानुसार ग्राहकांनाही त्यांच्या मोबाईल क्रमाकांची नोंद करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत साडेपाच कोटी ग्राहकांना अशा प्रकारचे एसएमएस मिळत आहेत. त्याशिवाय प्रशासनाच्या अन्य सुविधांची माहितीही ग्राहकांना या एसएमएसच्या माध्यमातून मिळत आहे. शिवाय, वीजबीलावर देण्यात येणारे मीटरचे फोटो न छापण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या खर्चाचीही आता बचत होणार आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.

असे झाले महावितरण हायटेक…!
– दोन वर्षात तब्बल अडीच कोटी ग्राहकांच्या मोबाईल क्रमाकांची नोंद
– तीस लाख ग्राहकांकडून महावितरणचे मोबाईल अॅप डाऊनलोड
– अॅप्सद्वारे साडेतीन लाख ग्राहकांचा वीजबीलाचा नियमित भरणा


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)