महात्मा गांधी यांचे काही निवडक प्रेरणादायी विचार

मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.  महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.  रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ही उपाधी दिली.

अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात ‘गांधी जयंती’ म्हणून तर जगभरात ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.  या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे.

-Ads-

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार.

१) राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे. आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत.
२) हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश ताप्तुरते असते. पण त्यामुळे होणारे नुकसान हे दीर्घकालीन असते.
३) नैतिकता ही गोष्टींचा आधार आहे आणि सर्व नैतिकतेचा सार आहे.

४) शरीर आणि मन अस्वच्छ असेल, तर परमेश्वर कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. मात्र, माणसे तना-मनाने स्वच्छ हवी असतील, तर त्याचे शरीर आणि परिसरही स्वच्छ ठेवा.
५) स्वतला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेमध्ये स्वतला गमावणे.

६)  अहिंसा ही विश्वासाचा लेख आहे.
७) सहानुभूती, गोड शब्द, ममतेची दृष्टी यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही.
८) तुम्ही धर्म माना किंवा मानु नका पण निती तत्वाचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

९) एखाद्या देशाची संस्कृती तेथील रहिवाश्यांच्या ह्रदयात आणि आत्म्यात वसलेली असते.
१०)  प्रेमाने जे मिळते ते कायमाचे टिकून राहते.
११) स्वतवर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते.
१२) स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या खालोखाल महत्वाची आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
2 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)