‘शिवस्मारका’साठी इतर तीन जागांचे प्रस्ताव

मुंबई – शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमापूर्वी झालेल्या बोट अपघातामध्ये एकाच बळी गेला. त्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अनेक संघटना,संघाकडून स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता इतर ठिकाणी व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे.

प्रस्तावित जागेवर ‘शिवस्मारक’ न होता ते ‘राजभवन’ येथे व्हावे अशी मागणी ‘मराठी सेवा संघा’कडून करण्यात आलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता जमिनीवर व्हावे, अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेड’चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी ‘रायगड’ किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगवरावर स्मारक करावे अशी मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी व्हाईस अॅडमिरल ‘आय.सी.राव.’ यांनी आपली मुंबई या संस्थेव्दारे शिवस्मारक हे ‘क्राॅस आयलंडवर’ करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांच्याकडे केली आहे. ‘शिवस्मारक’ प्रस्तावित जागेवर न होता इतर ठिकाणी व्हावे अशी मागणी होत असताना दुसरीकडे ‘मराठा क्रांती मोर्चा’ने मात्र हे स्मारक अरबी समुद्रात म्हणजेच आहे त्याच जागी करावे, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)