महाराष्ट्राचे पाणी गुजरातला का?

प्रकाश आंबेडकर : खुर्ची राखण्यासाठीच दुर्लक्ष

मुंबई – महाराष्ट्रात काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्याने त्याकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जातेय. तसेच आपली खुर्ची राखण्यासाठी हे केले जात आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगाविला. तसेच शिवसेनेने त्यावरुन कधी आवाज उठवला आहे का ? असा प्रश्‍नही उपस्थित केला.

मुंबईतील दादर, शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती आहे. तापी नदीचे वाया जाणारे पाणी वापरल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पण 70 वर्षांत निवेदनांना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे यापुढे निवेदन द्यायला जाणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेना-भाजपाचे अनेक नेते बिल्डर आहेत. त्यामुळे जिथे मिळेल तिथे जमीन गिळंकृत करतात. मग इकडचा स्थानिक माणूस उद्धवस्त झाला तरी चालेल. मुंबईत जमीन संपली आहे. आता गावठाणाच्या जमिनी आहेत. सातबारा नसल्यामुळे तुम्ही जमिनीचे मालक नाहीत असे सांगितले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 1880च्या कायद्याप्रमाणे कोळी, आग्री या गावठाणाच्या जमिनीचे मालक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुठल्याही पक्षाच्या बिल्डर असलेल्या उमेदवाराला मतदान करु नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वंचित बहुजन आघाडीबरोबर आलात तर तुमचे कोळीवाडे, भंडारीवाडे वाचवू, असे त्यांनी सांगितले.

पाकने भारतातील मुस्लिमांची चिंता करु नये – ओवेसी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास पाकिस्तानच जबाबदार असून त्यांची कट रचून हा हल्ल्या घडविला आहे. आता पाकिस्तावर थेट कारवाईची गरज असून त्यासाठी आमच्या सरकारला पाठिंबा आहे, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले. हा हल्ला घडवणारी जैश-ए-मोहम्मद माझ्या दृष्टीने जैश-ए-शैतान आहे. मसूद अजहर मौलाना नाही तर सैतान आहे, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. भारतात विविधतेत एकता आहे. हिंदुस्थानात मशिदीत नमाज अदा होणार, मंदिरात घंटा वाजणार हे लक्षात ठेवा. पाकिस्तानातील राजकारण्यांनी भारतातील मुस्लिमांची चिंता करु नये, असा टोलाही त्यांनी लगाविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)