रणजी करंडक : गुजरातचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय

पुणे: पियुष चावलाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल करत महाराष्ट्र संघाचे तीन गडी गारद केले आणि दुसऱ्या डावात महाराष्ट्र संघाला सर्वबाद 185 धावात रोखण्यात यश मिळवल्याने गुजरातने महाराष्ट्र विरुद्धचा अ गटातील रणजी सामना एक डाव आणि 130 धावांनी जिंकला आहे.

पहिल्या डावात महाराष्ट्राने 230 धावा केल्या होत्या तर गुजजरातने पहिला डाव 8 बाद 545 धावांवर घोषित करत 315 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात अखेरच्या दिवशी 185 धावात सर्वबाद झाल्याने सामना वाचवण्यात महाराष्ट्र संघाला अपयश आले. दोन्ही डावात मिळून 8 बळी घेणारा चिंतन गाजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या विजयामुळे गुजरातला 7 गुण मिळले आहेत तर महाराष्ट्राला एकही गुण मिळाला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौथ्या दिवशी 6 बाद 137 वरून आपला डाव पुढे सुरु केला. काल नाबाद राहिलेल्या अक्षय पालकरने काही काळ खेळपट्टीवर टिकून फलंदाजी केली. परंतु, चिंतन गाजाच्या एका चेंडूवर तो आपला संयम गमावून बसला आणि बाद झाला. त्यानंतर निकित धुमाळला साथीत घेत अनुपम संकलेचा यांनी सामना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केला. पण त्यांना फार काळ यश आले नाही. धुमाळला 16 धावांवर बाद करत पियुष चवलाने गुजरातला विजयाच्या जवळ नेले. त्यानंतर फल्लाहला फोपळाही फोडण्याची न संधी देता चावलाने महाराष्ट्राची अवस्था 9 बाद 185 केली. अनुपम संकलेचा 40 धावांवर नबाद रहिला. अंकित बावणे जायबंदी झाल्याने खेळू शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्राला सर्वबाद घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक- महाराष्ट्र पहिला डाव सर्वबाद 230, गुजरात पहिला डाव, 8 बाद 545 घोषित, महाराष्ट्र दुसरा डाव सर्वबाद 185 स्वप्नील गुगळे(18), चिराग खुराणा(0), ऋतुराज गायकवाड,(18), रोहित मोटवानी(7), राहुल त्रिपाठी(2), नौशाद शेख(40), अक्षय पालकर(34), अनुपम संकलेचा( नाबाद 40), निकिता धुमाळ (16), समद फल्लाह (0) आणि अंकित बावणे ( मैदानात उतरला नाही) . पियुष चावला 18-3, चिंतन गजा 47-3

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)