महाराष्ट्राच्या आर्यन वेर्णेकरचा राष्ट्रीय विक्रम !

शेरॉन साजू, रयना सलढाणा, नील रॉय यांनाही सुवर्णपदक ;राष्ट्रीय जलतरण स्पर्धा
पुणे: महाराष्ट्राच्या आर्यन वेर्णेकरने 14 वर्षांखालील मुलांच्या 50 मीटर बटरफ्लाय शर्यतीत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करताना राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. तसेच शेरॉन साजू, रयना सलढाणा, नील रॉय यांनीही आपापल्या गटातील शर्यतींमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटक संघाला 15 -0 असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ग्लेनमार्क 35 व्या सब-ज्युनिअर आणि 45 व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण अजिंक्‍यपद स्पर्धेचा आजचा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजविला. वॉटरपोलोच्या उपान्त्य फेरीत एसएफआयच्या संघाने कर्नाटकचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या संघाला मात्र केरळच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचा मुलींचा संघ ब्रॉंझ पदकासाठी कर्नाटकच्या संघाबरोबर खेळेल. तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघासमोर अंतिम फेरीत पश्‍चिम बंगालचे आव्हान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याआधी शेरॉन साजूने 17 वर्षांखालील मुलींच्या 50 मी ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, तर रयना सलढाणाने 17 वर्षांखालील मुलींच्या 100 मी फ्री स्टाईल शर्यतीत सोनेरी यश मिळविले. नील रॉयने 17 वर्षांखालील मुलांच्या गटातील 100 मी फ्री स्टाईल शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घालताना आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)