रणजी करंडक : महाराष्ट्र 5 बाद 112; दिवसअखेर 191 धावांची आघाडी

पुणे – रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील सामान्यात तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात महाराष्ट्र संघाने 5 बाद 112 धावापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता पहिल्या डावातील 79 धावाची आघाडी आणि आजच्या 112 धावा अशी मिळून एकूण 191 धावांची आघाडी झाली आहे. महाराष्ट्राने पहिल्या डावात 352 धावा केल्या होत्या.

-Ads-

कालच्या 5 बाद 196 धावसंख्येवरून पुढे खेळताना मुंबई संघाने कालच्या धावसंख्येत फक्त 77 धावांची भर टाकली. मुंबईचा पहिला डाव 273 वर आटोपला. मुंबई संघाकडून सिध्देस लाडने सर्वाधिक 93, आदित्य तरेने 63 आणि शुभम रांजणे याने नाबाद 54 धावा केल्या. महाराष्ट्र संघाकडून आशय पालकरने 4 तर समद फल्लाने 3 गडी बाद केले.

दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या 5 बाद 112 धावा झाल्या आहेत. महाराष्ट्राचे सलामीचे फलंदाज स्वप्नील गुगळे हा 37 तर चिराग खुराणा हा 38 धावावर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या जे.एस.पांडे 9, एन.एस.शेख 4 आणि आर. मोटवाणी 1 धाव काढुन बाद झाला.

मुंबई संघाकडून दुसऱ्या डावात गोलंदाजीत शिवम दुबे याने 2 तर शिवम म्हलोत्रा, रोस्टन डायस आणि आकाश पारकर याने प्रत्येकी 1 गडी बाद केला. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा राहुल त्रिपाठी नाबाद 13 आणि सत्यजित बच्छाव नाबाद 3 धावांवर खेळत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)