उजनी धरण पाणलोट क्षेत्रात आढळला तब्बल 42 किलोंचा ‘कटला’ जातीचा मासा 

इंदापूर – महाराष्ट्रातील इंदापूरच्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 42 किलोचा कटला जातीचा मासा सापडला आहे. आज पर्यंत उजनी धरण क्षेत्रात आढळेला सर्वात मोठा मासा असल्याचं मच्छिमारांकडून सांगितलं जात आहे.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्यात हा मासा सापडला आहे. हा मासा कटला जातीचा असून तब्बल 42 किलोचा आहे. हा मासा भिगवण येथील उपबाजाराजात विक्रीस आणला असता, काही वेळातच 130 रूपये दराने हा मासा एका खरेदीदाराने विक्री केला.

उजनी धरण पाणलोट क्षेत्राची सर्वात मोठी जलक्षमता असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील मासेमारीत सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हजारो मच्छिमार मासेमारी करून आपली उपजीवीका करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)