महाराष्ट्र शिक्षक भरती 2019 : १०,००१ जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध

पुणे – राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. पहिल्या टप्प्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये केवळ 15 हजार शिक्षकांचीच भरती होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात प्रदर्शित करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 25 हजार शिक्षकांची भरती करण्याच्या घोषणा अनेकदा केल्या आहेत. मात्र, शिक्षक भरतीची आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. यापैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)