राज्य गुणवत्ता यादीत 24 विद्यार्थी

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल; 1315 विद्यार्थी पात्र

नगर – शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा नगर जिल्ह्याने घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत पाचवीचे आठ आणि आठवीचे 16 असे 24 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील 1315 विद्यार्थी या शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र झाले आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता वाढावी, शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात दिसू लागला आहे. त्याच अनुषंगाने शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्ह्याने घवघवीश यश मिळवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 46 हजार 184 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषदेने भरले होते. यंदा 14 हजार विद्यार्थ्यांचे आठ लाख 39 हजार 50 रुपये जिल्हा परिषदेने भरले होते. परीक्षेत पाचवीमधील 677 तर आठवीमधील 638 असे 1315 विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत. आता पात्र पाचवीच्या विद्यार्थ्यांना 100 रुपये व आठवीच्या विद्यार्थ्यांना 150 रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती मिळणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या शाळांतील दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले. कोपरगाव तालुक्‍यातील सर्वांधिक म्हणजे 219 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत, असे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सांगितले.

राज्यात तिघे चमकले

माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत येथील रेसिडेन्सीयल हायस्कुलची श्रद्धा लगड ही विद्यार्थिनी राज्यात पहिली आली आहे. पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) परीक्षेत जिल्हा परिषदेच्या लटकेवस्ती (ता. जामखेड) येथील शाळेतील सार्थक कडू याने राज्य गुणवत्ता यादीत सहावा आणि जिल्हा गुणवत्ता यादीत पहिला तर मेंगडेवस्ती (ता. कर्जत) येथील श्रेयस ताठे हा विद्यार्थी राज्यात दहावा आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)