मुंबई – देशात पेट्रोल-डिझेल दराने नवीन उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यापासून पेट्रोल-डिझेल दर सातत्याने वाढतच आहेत. गेल्या चार दिवसांत मुंबईतील पेट्रोलच्या किंमतीत 1.62 रूपयाने वाढ झाली आहे. एकीकडे पेट्रोलचे दर वाढताना दुसरीकडे डिझेलही पेट्रोल दराला गाठत असल्याचे दिसत आहे.

मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 86.72 रूपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 75.74 रूपये इतका आहे. मुंबईप्रमाणे राज्यातील इतर शहरात देखील इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल मिळणाऱ्या यादीत अमरावती शहर पहिल्या तर सोलापूर शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती शहरात एक लिटर पेट्रोलसाठी 89.97 रूपये तर सोलापूरमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 87.77 रूपये मोजावे लागत आहेत.

पुणे शहरात आजचा पेट्रोलचा दर 86.58 रूपये तर डिझेलचा दर 74.44 रूपये असा आहे. पुणे लगतच्या पिंपरीचिंचवड शहरात आजचा पेट्रोलचा दर 86.64 रूपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 74.45 रूपये असा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलच्या किंमतीतील चढउतार आणि डाॅलरच्या तुलनेत रूपयांच अवमूल्यन होत असल्याने इंधनदरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)