महाराष्ट्रात सलग आठव्या दिवशी इंधन दरवाढ सुरूच, परभणीत सर्वांत महाग पेट्रोल

पुणे शहरात आजचा पेट्रोलचा दर 87.36 रूपये लिटर आणि डिझेलचा दर 75.65 रूपये असा आहे. पुणे लगतच्या अौद्योगिक नगरीत म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोलचा दर 87.69 रूपये तर डिझेलचा दर 75.66 रूपये लिटर इतका आहे.

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या दरात सप्टेंबरपासून सलग आठव्यादिवशीही दरवाढ सुरूच आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतर प्रमुख शहरातदेखील पेट्रोल दरवाढ होतच आहे. मुबंईतील पेट्रोल दराचा हा उच्चांक असून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणी शहरात मिळत आहे. त्यापाठोपाठ अमरावती शहराचा क्रमांक लागतो.

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत आज 38 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 47 पैशांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.77 रूपयांवर पोहोचल आहे, तर डिझेल 76.98 रूपये झालं आहे. महाराष्ट्रातील परभणीत तर पेट्रोलचा आजचा दर सर्वात जास्त असून  89.57 रूपये लिटर तर अमरावतीमध्ये 89.03 रूपये इतका आहे.

सध्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाने नीचांकी मूल्य गाठले आहे. त्यामुळे कच्च्या इंधनाच्या आयातीसाठीचा खर्च वाढला आहे. त्यातून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. ताज्या दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल लिटरमागे 80.38 रूपयांवर तर डिझेल 72.51 रूपयांवर पोहचले आहे.

गेल्या दिवसात पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होतेय. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी मुंबईत पेट्रोलचा दर 86.09 रूपये प्रति लिटर असा होता. आज 8 सप्टेंबरला हाच दर 87.77 रूपयांवर पोहचला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 1.69 रूपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.

सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारे इंधन दरवाढीचे सत्र कायम आहे. इंधन दरवाढीचा परिणाम इतर वस्तूच्या किंमतीवर होत असून इंधन दरवाढीमुळे दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तू आणि भाजीपाला यांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)