‘हिंसक आंदोलन’ केल्यास प्रशासन बघ्याची भूमिका घेणार नाही : चंद्रकांत पाटील

जिल्हयात 24 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा तोफ डागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दराबाबत साखरपट्ट्यात सुरू असणाऱ्या आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले आहे. हिंसक आंदोलन केले तर प्रशासन बघ्याची भूमिका घेणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे खोटे बोलत आहेत आणि तेही रेटून बोलतात. त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सोडावे. राजू शेट्टी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हिंसक आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांना शांत बसण्याचे आवाहन करून दाखवावे. कारण शेतकरी आंदोलन हे केवळ पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन केले जात असून मूळ शेतकरी मात्र आपला ऊस कारखान्यांना घालण्यासाठी तयार झालेला आहे.

शेतकऱ्यांना शांत बसण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले तर त्यांना कळेल कि किती शेतकरी त्यांच्या बाजूने आहेत. राजू शेट्टी यांना केवळ लोकसभेची निवडणूक कोल्हापुरातून लढवायची आहे. म्हणूनच ऊस आंदोलन केवळ कोल्हापूर पुरता मर्यादित असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर चारा पोहचवणार

राज्य भरात दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती असल्याने त्याचा परीणाम जनावरांसाठीचा चार आणि पाण्या वर होणार आहे. चारा छावण्या बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही उलट जानेवारी नंतर निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे . शेतकऱ्याच्या खात्यावर चाऱ्याचे पैसे जमा न करता त्याला थेट बांधावरती चारा कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)