मांझी यांची रालोआ व महाआघाडीवरही टीका

औरंगाबाद -बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीची तुलना नागराज आणि सर्पराजशी केली आहे.

एक सर्पराज तर दुसरा नागराज होतो. नागराजाच्या फुत्कारामुळे लोक मरतात आणि सर्पराजाच्या दंशावर एखाद्या मंत्रामुळे माणूस वाचू शकतो, औरंगाबाद येथील एका राजकीय कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मांझी यांनी असे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मांझी यांनी हे विधान लोकसभा निवडणुकीत अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी महाआघाडीवर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणून केले असल्याचे मानले जात आहे. हिंदुस्थानी अवामी मोर्चाला योग्य जागा न मिळाल्यास आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे मांझी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)