डिझेलचे भाव आणखी 4 रूपयांनी कमी करणार – मुख्यमंत्री

नाशिक – देशभरामध्ये गेल्या महिनाभरापासून वाढीस लागलेले पेट्रोल व डिझेलचे भाव गुरूवारी केंद्र सरकारद्वारे २.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त करत दिलासा दिला. आता त्यापाठोपाठ डिझेलच्या दरातही कपात होणार आहे. डिझलेचे दरही 4 रूपयांनी स्वस्त करणार असल्यांच आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

या निर्णयामुळे इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना पुन्हा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक करांमुळे इंधनाच्या दरांमध्ये तफावत आढळून येते. या कपातीमुळे सरकारच्या तिजोरीवर 10.50 हजार कोटींचा भार पडणार आहे. तसेच राज्य सरकारला याचा आर्थिक फटका बसणार आहे. पण जनतेसाठी तो सहन करण्याची तयारी असल्यांच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)