इंधन दरवाढीचे सत्र कायम, ‘परभणीत’ पेट्रोलच्या किंमतीनं गाठली नव्वदी

महाराष्ट्रातील इतर शहरातील इंधनाचे दर

पुणे शहरात आजचा पेट्रोलचा दर 87.75 रूपये लिटर आणि डिझेलचा दर 75.76 रूपये असा आहे. पुणे लगतच्या अौद्योगिक नगरीत म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोलचा दर 87.81 रूपये तर डिझेलचा दर 75.77  रूपये लिटर इतका आहे. इतर शहरातील पेट्रोल दर पुढीलप्रमाणे : परभणी (89.68), बुलढाणा (89.40),धुळे (87.94), नांदेड(88.37), नंदूरबार (88.69). 

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात सप्टेंबरपासून सलग नवव्या दिवशीही दरवाढ सुरूच आहे. मुंबईत पेट्रोलचे दर रोज नवीन उच्चांक गाठत असताना देशाच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत असून किंमतीने नव्वदी गाठली आहे.

इंधन दरवाढीचे सत्र कायम असून आज पुन्हा एकदा पेट्रोलचा दर 12 पैशांनी तर डिझेलचा दर 11 पैशांनी महागला आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.89 रूपयांवर पोहोचल आहे, तर डिझेल 77.09 रूपये झालं आहे. महाराष्ट्रातील परभणीत सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री होत आहे.  परभणीमध्ये पेट्रोलचा आजचा दर 89.68 रूपये लिटर तर डिझेल 77.06 रूपये प्रति लिटर असा आहे.

इंधन दरवाढीचा परिणाम इतर वस्तूच्या किंमतीवर होत असून इंधन दरवाढीमुळे दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तू आणि भाजीपाला यांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून ‘भारत बंद’ ची हाक

इंधन दरांनी जनसामान्यांचे कंबरडे मोडल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी कर कमी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.मात्र, इंधनांवरील कर कमी करण्याचा मोदी सरकारचा तूर्त कुठलाही विचार नसल्याचे संकेत मिळत आहेत. दरवाढीच्या सत्रामुळे सरकारविरोधात निदर्शने करण्यास सज्ज झालेल्या विरोधकांच्या संकल्पाला आणखीच इंधन मिळत आहे. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी (10 सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसच्या ‘भारत बंद’ मध्ये आरजेडी आणि डीएमके सुध्दा सामील होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)