इंधन दरवाढीचे विघ्न हटेना, महाराष्ट्रातील ११ शहरात ‘पेट्रोल’ नव्वदी पार

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल दर 

परभणी  ९१.२५
नांदेड  ९१.०१
नंदुरबार  ९०.२८
लातूर  ९०.२०
जालना  ९०.२६
जळगाव  ९०.३९
हिंगोली  ९१.०६
गोंदिया  ९०.५०
बीड  ९०.४४
औरंगाबाद  ९०.४९ 
रत्नागिरी  ९०.४५
पुणे  ८९.२८

मुंबई – मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशात पेट्रोल दरवाढीची सर्वाधिक झळ ही महाराष्ट्र राज्याला पोहचत आहे.

एेन गणेशोत्सवात सामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढीची झळ सोसावी लागत आहे, त्यामुळे इंधनदरवाढीचे विघ्न काही हटताना दिसत नाही आहे.

-Ads-

महाराष्ट्राला पेट्रोल दरवाढीची झळ सर्वाधिक बसत असून महाराष्ट्राच्या तब्बल ११ शहरात पेट्रोलच्या किंमतीने नव्वदी पार केली आहे. यापैकी परभणी आणि नांदेड शहरात तर पेट्रोलचे दर ९१ रूपयांच्या वर गेले आहेत. उर्वरित नऊ शहरात पेट्रोलचे दर ९१ रूपयांच्या जवळपास आहेत. पण सातत्याने होणारी दरवाढ पाहता लवकरच या शहरात देखील पेट्रोलचे दर ९१ रूपयांच्या वर जातील यात शंका नाही.

देशभरात इंधन दरवाढ ही सुरूच असून आज (सोमवारी) मुंबईत पेट्रोल प्रति लीटरमागे १५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ७ पैशांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलची विक्री प्रति लीटर ८९.४४ रूपये तर डिझेलची विक्री प्रति लीटर ७८.३३ रूपयांनी होत आहे.

गेल्या आॅगस्ट महिन्यापासून सातत्याने इंधनदरवाढ होत आहे. गेल्या एक महिन्यांत फक्त दोनदाच इंधनदरवाढ झालेली नाही. हे दोन दिवस वगळता सातत्याने इंधनदरवाढ सुरूच आहे. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांचे वाढलेले दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाच्या मुल्यातील मोठी घसरण या घटकांमुळे पेट्रोल, डिझेल दर वाढत आहेत.

जनसामान्यांना होरपळून काढणाऱ्या इंधन दर भडक्‍यामुळे मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. असे असले तरी इंधनांवरील कर कमी करून ते स्वस्त करण्यासंदर्भात पाऊल उचलण्याची तूर्त सरकारची तयारी नसल्याचेच संकेत मिळत आहेत. दुसरीकडे आंध्रप्रदेश, राजस्थान  आणि पश्चिम बंगाल सरकारपाठोपाठ कर्नाटक सरकारने पेट्रोलच्या किंमतीत कपात केली आहे. त्यानंतर आता पेट्रोलचे दर सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत अशी कपात होईल का ? अशी आशा महाराष्ट्रामधील जनता बाळगून आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)